नेपाळचं भारतात विलीनीकरण का झालं नाही, नेहरूंनी काय दिली होती ऑफर?
जर माजी PM पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांची ऑफर स्वीकारली असती तर आज नेपाळ भारताचे एक राज्य असते
जागतिक परिस्थिती पाहता राजा त्रिभुवन यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करायचे होते आणि त्यांनी हा प्रस्ताव नेहरूंसमोर ठेवला होता
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे
नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे या कारणास्तव पंडित नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला होता
जर हीच ऑफर इंदिरा गांधींना दिली असती तर त्यांची भूमिका काय असती? यावरही मुखर्जी यांनी पुस्तकात खुलासा केला.
जर इंदिरा नेहरूंच्या जागी असत्या तर त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घेतला असता, जसं त्यांनी सिक्कीमच्या बाबतीत केले असं मुखर्जींनी म्हटलं
नेपाळमध्ये सध्या अशांतता असून देशाची संसद, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थानाला आंदोलकांनी आग लावली आहे