उत्तम आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी टाळा

सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला झोप महत्वाची आहे. 

रात्री झोपण्यापूर्वी किमान ३०-६० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा.

मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर पडणारा ब्लू लाईट आपल्या डोळ्यांना थकवतो आणि मेंदूला संकेत देतो की अजून दिवसच आहे. यामुळे झोप येण्यास मदत करणाऱ्या मेलाटोनिन संप्रेरकाची निर्मिती कमी होते.

दुपारची डुलकी २०-३० मिनिटांची असेल तर ठीक आहे, पण जर तुम्ही दुपारी तासनतास झोपलात, तर रात्री वेळेवर झोप येत नाही.

झोपण्यापूर्वी लगेच खूप तेलकट किंवा जड जेवण केल्याने पचन प्रक्रियेत अडथळा येतो.

यामुळे छातीत जळजळ होऊ शकते आणि शांत झोप लागत नाही.

दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते. यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.

दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते. यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.

झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. खोलीत अंधार आणि शांतता ठेवा.

Click Here