सध्या फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्सचा ट्रेंड आला आहे.
सध्याचे नवीन स्मार्टफोन्स काहीच मिनिटांत फुल चार्ज होतात, पण यामुळे फोनच्या बॅटरीचे आयुष्य कमी होते.
अल्ट्रा फास्ट चार्जिंगमध्ये बॅटरीला हाय व्होल्टेज मिळते आणि ती जास्त तापते, ज्यामुळे डिग्रेडेशन लवकर सुरू होते.
लिथियम आयन बॅटरीला उष्णता सर्वात जास्त नुकसान करते. तापमान जितके वाढेल, तितकी बॅटरीची क्षमता घटते.
परीक्षणांमध्ये स्पष्ट झाले आहे की, गरम परिस्थितीत चालणाऱ्या बॅटर्या सामान्य वापरापेक्षा 20-30% जास्त खराब होतात.
प्रत्येक बॅटरीला एक ठरलेली चार्ज सायकल असते. वारंवार 0-100% फास्ट चार्ज केल्याने ही सायकल लवकर संपते आणि हेल्थ घटते.
जास्त फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी हेल्थ काही महिन्यांतच 90% खाली जाते आणि बॅकअप लक्षणीय कमी होतो.
अल्ट्रा-फास्ट चार्जिंग फक्त गरजेच्या वेळीच वापरा. दैनंदिन वापरासाठी स्लो किंवा नॉर्मल चार्जिंग अधिक सुरक्षित आहे.