ब्रँड ठाकरे! उद्धव-राज 'शिवतीर्थ'वर एकत्र; ७ फोटो पाहा

२ दशकानंतर ठाकरे कुटुंबात दिसला एकोपा; मराठी माणसांना सुखावणारा क्षण

गणेशोत्सवाचं औचित्य साधत उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी बसणाऱ्या दीड दिवसाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब आले होते

अनेक वर्षांनी ठाकरे कुटुंबातील एकोपा सर्वांना दिसला. यावेळी राज ठाकरेंच्या आई, राज-उद्धवचे मामा हेदेखील उपस्थित होते

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले

राज यांच्या घरातील प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंच्या फोटो फ्रेमसमोर राज-उद्धव यांचा फोटो लक्षणीय ठरला

मागील काही काळापासून राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युतीचीही जोरदार चर्चा आहे

गेल्या ४ महिन्यातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही तिसरी भेट असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे

Click Here