दिसायला सुंदर पण उद्योग काळे, मंत्रीणबाईंचे कारनामे
दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री...
हिना रब्बानी खार या पाकिस्तानातील राजकीय नेत्या. त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या सौंदर्याचीच चर्चा जास्त.
२०११ साली त्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री होत्या. या पदावर निवडून आलेली हिना ही पहिली महिला आणि सर्वात तरुण व्यक्ती.
जगभरात हिना पाकिस्तानची बाजू मांडतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होतात. आताही त्यांची नव्यानं चर्चा आहे.
हिनाचे वडील गुलाम नूर रब्बानी खार हे पाकिस्तानी राजकारणी, जमीनदार होते तर काका गुलाम मुस्तफा खार हे पंजाब प्रांताचे माजी गव्हर्नर.
हाफिज अब्दुर रौफ हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा वरिष्ठ दहशतवादी आणि अमेरिकेच्या "स्पेशली डेजिग्नेटेड नॅशनल अँड ब्लॉक्ड पर्सन्स" ला मदत करताना हिना दिसली, आणि पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली.
वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी अप्रत्यक्षपणे हाफिज सईदला संरक्षण देण्यापर्यंत हिनाची मजल गेली होती.
बलुचिस्तानमध्ये भारतच प्रॉक्सी वॉर करतोय असा आततायी प्रचारही तिने केला होता.