तुम्ही नंबर ब्लॉक केला तरी स्पॅम कॉल येणारच, हे करा

अनावश्यक कॉल, मेसेजचा प्रत्येकाला कंटाळा येतो, दिवसातून बरेच स्पॅम कॉल येतात.

फक्त मोबाइल फोनवरील नंबर ब्लॉक केल्याने स्पॅम कॉल आणि फसवे संदेश थांबणार नाहीत. 

ते थांबविण्यासाठी, ग्राहकांनी ट्राय डीएनडी ॲपद्वारे स्पॅम तक्रारी दाखल कराव्यात, असे दूरसंचार नियामक ट्रायने स्पष्ट केले आहे.

‘डू नॉट डिस्टर्ब’ या संकल्पनेवर आधारित हे ॲप ट्रायचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. त्याठिकाणी ग्राहक अनावश्यक कॉल, मेसेजची तक्रार थेट नोंदवू शकतात. 

या तक्रारींच्या आधारे स्पॅम करणाऱ्या नंबरांवर कारवाई होते, आतापर्यंत २१ लाखांपेक्षा जास्त मोबाइल नंबर डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. 

नेमके काय होते? : डीएनडी ॲपवर मोठ्या प्रमाणात मिळालेल्या तक्रारींच्या आधारे संशयित नंबरांची ओळख पटते. 

त्यांची चौकशी करून कायमस्वरूपी डिस्कनेक्ट करण्याची प्रक्रिया दूरसंचार कंपन्या आणि नियामक संस्था करतात, असे ट्रायने म्हटले आहे.

Click Here