भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? 

जाणून घ्या सत्य!

बऱ्याच लोकांना वाटतं की भात खाल्ल्याने वजन पटकन वाढतं.

वजन वाढणं हे आपण किती आणि कशा प्रकारचा भात खातो यावर अवलंबून असतं.

भातामुळे थेट वजन वाढत नाही, तर जास्त प्रमाणात खाल्ल्यास आणि विशेषत: तुप-तेल, बटाटे, तळलेले पदार्थ यांसोबत खाल्ल्यास कॅलरी वाढतात आणि त्यामुळे वजन वाढतं.

ब्राउन राईस/हातसडीचा भात यात फायबर, प्रोटीन आणि मिनरल्स जास्त असल्याने तो पचायला वेळ घेतो, भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहायला मदत होते. 

त्यामुळे शक्य असल्यास हातसडीचा भात किंवा ब्राउन राईस खा.

 भात पूर्णपणे टाळण्यापेक्षा मापात खाणं चांगलं असतं. वजन वाढ टाळण्यासाठी भातासोबत डाळ, कडधान्य, भाज्या खाव्यात. त्यामुळे प्रोटीन आणि फायबर मिळून पोट भरतं.

भात खाल्ल्याने वजन थेट वाढत नाही. प्रमाण, प्रकार आणि जीवनशैली यावर ते अवलंबून आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत भात खाल्ल्यास वजन वाढत नाही.

तसेच जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल आणि संतुलित आहार घेत असाल तर भात खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही.

Click Here