स्वप्न साकार! IPS डोणेंचाकुटुंबासोबत पहिला विमान प्रवास
आयपीएस बिरदेवडोणे यांनी आई-वडिलांना पहिलाच विमानप्रवास घडवला.
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या मेंढपाळ कुटुंबातील भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी बिरदेवडोणे यांच्या आयुष्यात हा भावस्पर्शी क्षण नुकताच साकार झाला आहे.
यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत आयपीएस पदावर निवड झाल्यानंतर बिरदेवडोणे यांचे देशभरात कौतुक झाले.
मात्र, या यशाचा खरा आनंद त्यांनी आई-वडिलांसोबत वाटला, त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून. ते सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिसअकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत.
याच प्रशिक्षण केंद्राला भेट देण्यासाठी त्यांनी आई वडिल आणि कुटुंबीयांना सोबत नेले होते. इंडिगो विमानातून झालेला हा प्रवास त्याच्या आई-वडिलांसाठी पहिलाच विमान प्रवास आहे.
नऊवारी साडी व नाकात मोठी नथ घातलेली आई आणि अंगावर घोंगडे घेतलेल्या वडिलांनी विमानतळावर आणि विमानात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
साधेपणात दडलेला आत्मविश्वास, चेहऱ्यावरील समाधान आणि डोळ्यांतून ओसंडून वाहणारा अभिमान हे दृश्य अनेकांना भावूक करून गेले.
डोणे लिहितात, ज्या दिवसांपासून मी फक्त विमान पाहण्याची स्वप्न पाहात होतो, तेथून आज माझ्या आई-वडिलांना त्या विमानाच्या पायऱ्या चढताना पाहणे इथंपर्यंतचा प्रवास हा क्षण शब्दांत मांडणे कठीण आहे.
विलास नाही... दिखावा नाही.... फक्त कृतज्ञता. त्यांचे हास्य म्हणजेचं माझे यश.