देवगिरी किल्ला म्हणजे रणनीती, रोमांच आणि रहस्याने भरलेलं ठिकाण
मध्ययुगीन महाराष्ट्राचं सामर्थ्याचं प्रतीक असलेला यादव राजांनी १२ व्या शतकात उभारलेला देवगिरी किल्ला आजही अभेद्य अन् अजेय भासतो.
एकमेव वळणदार, अरुंद वाट, भुलवणारे मार्ग, आणि अंधारी बोगदे असल्याने देवगिरी किल्ला रणनीतीचं शिखर ठरतो
खंदकात मगरी? आख्यायिकेनुसार संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्याभोवतीच्या खंदकात मगरी असायच्या!
विजयोत्सवाचं प्रतीक आलेला किल्ल्यातील पर्शियन शैलीतला ६४ मीटर उंच मनोरा लक्ष वेधतो.
किल्ल्यावर तोफांचे संग्रहालय असून येथे १४ टन वजनाची मेंढा तोफ आकर्षण आहे.
तुघलकाने संपूर्ण राजधानी दिल्लीहून इथे हलवण्याचा अनोखा पण अयशस्वी प्रयोग केला होता.
शत्रूला अडकवण्यासाठी किल्ल्यावर अनेक गुप्त दरवाजे आणि भूलभुलैय्याची खास योजना आहे.
चिनी महाल ते बारादरी मंडप असे राजेशाही वैभव असा इतिहास इथे आजही जिवंत आहे.
छत्रपती संभाजीनगरहून अवघ्या १६ किमीवर असलेल्या देवगिरी किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून डेक्कन पठाराचं विहंगम दृश्य अविस्मरणीय अनुभव देते.