हॉटेल रूममधून 'या' गोष्टी चुकूनही घरी नेऊ नका!

काही लोकांना हॉटेलमधून चांगल्या वस्तू घेऊन जाण्याची सवय असते.

जेव्हा आपण कुठेही प्रवास करण्याचा विचार करतो, तेव्हा आपण सर्वात आधी आपल्या राहण्यासाठी हॉटेल बुक करतो.

अनेक हॉटेल्स खूप सुंदर असतात आणि तिथे ठेवलेल्या वस्तूही खूप सुंदर असतात. त्या बघून घरी घेऊन जावं वाटतं.

काही लोकांना हॉटेलमधून अनेक चांगल्या वस्तू घेऊन जाण्याची सवय असते.

मात्र, हॉटेलमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कधीही सोबत नेऊ नयेत. 

प्रत्येक हॉटेलमध्ये बाथरोब असतो, लोकांना तो घालून आंघोळ करायला आवडते, पण घरी घेऊन जात असाल,तर तो अनेक लोकांनी वापरला आहे, हे लक्षात ठेवा.

हॉटेलमधील कटलरी वस्तू जसे की ग्लास, वाट्या, चमचे इत्यादी देखील घेऊ नयेत.

हॉटेलमध्ये कपाटांमध्ये हँगर्स लटकवलेले असतात, ते सोबत घेऊन जाऊ नका. जर तुम्ही ते हँगर्स सोबत नेले, तर तुम्हाला क्षद चोर समजले जाईल.

खोलीत इलेक्ट्रॉनिक किटली, इस्त्री किंवा इतर कोणतीही वस्तू असल्यास ती सोबत घेऊ नका. तुम्ही पकडले गेलात, तर तुम्हाला दुप्पट भाडे द्यावे लागेल.

हॉटेलच्या खोलीतील बेडशीट्स सोबत नेऊ नका. बेडशीट्स धुऊन नंतर वापरल्या जातात, पण त्या फारशा स्वच्छ नसतात.

हॉटेलच्या खोलीतून तुम्ही साबण, टूथपेस्ट, शाम्पू, क्रीम घेऊ शकता. तुम्हाला या गोष्टी मोफत नेता येतात.

Click Here