डोनाल्ड ट्रम्प की पुतिन, कोणाच जास्त शिक्षण?

दोन नेत्यांची काल अलास्कामध्ये बैठक झाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाली आहे. ही बैठक सुमारे ३ तास चालली.

बैठकीनंतर दोघांनीही सुमारे १२ मिनिटे पत्रकार परिषद घेतली पण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

१४ जून १९४६ रोजी न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या ट्रम्प यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण क्यू फॉरेस्ट स्कूलमधून घेतले.

त्यानंतर ट्रम्प दोन वर्षांसाठी न्यू यॉर्क मिलिटरी अकादमी, फोर्डहॅम विद्यापीठ आणि नंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेले.

ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्स अँड कॉमर्समधून अर्थशास्त्र शास्त्रात पदवी प्राप्त केली.

पुतिन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लेनिनग्राड (आता सेंट पीटर्सबर्ग) येथील त्यांच्या घराजवळील शाळेत झाले.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुतिन यांनी १९७५ मध्ये लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटी (सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी) मधून कायद्याची पदवी प्राप्त केली.

१९९० मध्ये व्लादिमीर पुतिन यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी देखील मिळवली.

पीएचडी करण्यापूर्वी पुतिन रशियाच्या गुप्तचर संस्थेत केजीबीमध्ये काम करत होते.

Click Here