१० रुपयांच्या नोटेवर स्टार का असतो?

१० रुपयांच्या नोटेवरील स्टारचे चिन्ह सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

१० रुपयांच्या नोटेवरील स्टारचे चिन्ह सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ही खास नोट असल्याचा अनेकांचा दावा आहे.

सोशल मीडियावरील काही वापरकर्ते याला बनावट नोट म्हणत आहेत. आरबीआयने स्वतःच याचे सत्य सांगण्यासाठी स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय चलन जारी करणारी रिझर्व्ह बँक म्हणते की नोटांच्या आकड्यांमध्ये दिसणारे स्टारचे चिन्ह काही खास नोटांमध्ये दिसते.

जर नोटेच्या क्रमांकाच्या मध्ये स्टार असेल तर याचा अर्थ असा की ही नोट बदलण्यात आली आहे किंवा पुनर्मुद्रित करण्यात आली आहे.

भारतीय चलनी नोटांच्या आकड्यांमधील स्टार दर्शवितो की नोटमध्ये डिफ्टेक्ट आल्यानंतर ती पुन्हा छापण्यात आली आहे.

स्टार सिरीजच्या नोटा इतर चलनी नोटांसारख्याच असतात. या विशेष नोटा नाहीत किंवा त्यामध्ये कोणतीही समस्या नाही. आरबीआयने हे स्पष्ट केले आहे.

जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर भारतीय चलनाबाबत दिशाभूल करणारा दावा केला जातो किंवा कोणतीही चुकीची गोष्ट बोलली जाते तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याबाबत स्पष्टीकरण देते.

Click Here