अनेकांकडे दोन दोन सिम कार्ड असतात. यामध्ये ते फक्त एका नंबरवर रिचार्ज करतात.
अनेकजण बराच वेळ रिचार्ज करत नाहीत, यामुळे त्यांचा नंबर बंद होतो.
जर सिम कार्ड रिचार्ज केले नाही तर ते किती दिवसांत बंद होईल ते अनेकांना माहित नाही.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सिम कार्ड बंद करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
जर तुम्ही तुमचा फोन रिचार्ज केला नाही, तर तुमचे आउटगोइंग कॉल आणि एसएमएस १५ दिवसांच्या आत बंद होतील पण इनकमिंग कॉल काही काळ चालू राहतील.
यानंतरही जर तुम्ही रिचार्ज केले नाही तर पुढच्या टप्प्यात येणाऱ्या सेवा देखील बंद होतील.
अनेक प्रकरणांमध्ये, सिम सुमारे ६० ते ९० दिवसांत पूर्णपणे निष्क्रिय होते.
९० दिवसांच्या निष्क्रियतेनंतर, दूरसंचार कंपनी तो नंबर पुन्हा सक्रिय यादीत टाकू शकते आणि दुसऱ्याला देऊ शकते.
याचा अर्थ जर तुम्ही तुमचा नंबर बराच काळ वापरला नाही तर तो दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकतो.