कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेह बरा होतो?

कारले शरीरासाठी फायद्याचे आहे.

मधुमेह हा भारतात एक सामान्य आजार आहे. लोक तो गांभीर्याने घेत नाहीत आणि उपचारांकडे दुर्लक्ष करतात.

काही दिवसापूर्वी मधुमेही रुग्णाने त्याच्या आरोग्याबद्दल निष्काळजीपणा दाखवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

त्या व्यक्तीला मधुमेहाचे निदान झाले तेव्हा त्यांनी औषधे घेण्याऐवजी घरगुती उपचारांवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला.

त्या व्यक्तीच्या निष्काळजीपणाचा परिणाम असा झाला की त्याचा आजार वाढतच गेला. अखेर, वयाच्या ६० व्या वर्षी, रक्तातील साखर वाढल्यामुळे त्याचे मूत्रपिंड निकामी झाले.

घरगुती उपायांनी रक्तातील साखर कमी करता येते का? कारल्याचा रस पिऊन मधुमेह बरा होऊ शकतो का?, असा प्रश्न अनेकांना पडतो.

डॉक्टर सांगतात, या घरगुती उपचारांचा रक्तातील साखरेवर खूप सौम्य परिणाम होतो.

हे उपाय मधुमेहाच्या उपचारांना पर्याय नाहीत, विशेषतः जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण बराच काळ जास्त असते.

तुम्ही फक्त तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलून तुमचा मधुमेह बरा करू शकत नाही.

तुम्हाला औषधे आणि नियमित वैद्यकीय तपासणीचीही तितकीच गरज आहे.

Click Here