वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.
बरेच लोक त्यांच्या आहारातील साखर आणि कॅलरीज कमी करण्यासाठी डाएट कोक किंवा इतर डाएट कोल्ड्रिंक्स पितात.
डाएट कोक पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यात किती तथ्य आहे? आणि ते आरोग्यासाठी चांगले आहे का?
ज्यावेळी आपण डाएट कोक पितो त्यावेळी आपल्या शरीराला वाटतं की आपण काहीतरी गोड प्यायलो आहोत. म्हणजे आता आपल्याला ग्लुकोज मिळेल. शरीराला ऊर्जा मिळेल.
डाएट कोल्ड्रिंक्समध्ये साखर नसते. तसेच त्यात कॅलरीजही नसतात. अशा परिस्थितीत, शरीराला खऱ्या साखरेची मागणी सुरू होते.
ऊर्जेच्या शोधात, शरीर उपासमारीचे संकेत पाठवू लागते. अशा परिस्थितीत, व्यक्ती जास्त अन्न खातो. परिणामी, डाएट कोल्ड्रिंक्स पिऊनही वजन कमी होत नाही.
याशिवाय, डाएट कोल्ड्रिंक हे मूत्रवर्धक आहे. याचा अर्थ ते पिल्याने तुम्हाला वारंवार लघवी होते. हे त्यात असलेल्या कॅफिनमुळे होते.
जर एखादी व्यक्ती दररोज सात किंवा आठ ग्लास पाणी पीत नसेल तर त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.
शरीरात ज्यावेळी पाण्याची कमतरता भासते त्यावेळी थकवा जाणवतो. डोकेदुखी होते. काम करावेसे वाटत नाही. चक्कर येण्याची तक्रार देखील होऊ शकते.
एक गोष्ट निश्चित आहे की त्यात कॅलरीज नसतात. म्हणून जेव्हा तुम्हाला कोल्ड्रिंकची तीव्र इच्छा असेल तेव्हाच तुम्ही डाएट कोक प्यावे.
तसेच, डाएट कोक प्यायल्यानंतर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे आणि जास्त खाणे टाळले पाहिजे.