तुमच्या उशाजवळ आहे 'रेडिएशन बॉम्ब'
रात्री उशिरा झोपणे नाही, तर उशिरापर्यंत फोन वापरणे आणि तो जवळ ठेवून झोपणे हे डोकेदुखी आणि डोळ्यांच्या त्रासाचे मुख्य कारण आहे.
मोबाइलमधून सतत रेडिएशन (किरणोत्सर्ग) निघत असते. उशाजवळ फोन ठेवून झोपल्यास हे रेडिएशन मेंदूवर परिणाम करते.
फोनमधून निघणारा निळा प्रकाश झोपण्यास मदत करणारा मेलाटोनिन हार्मोन कमी करतो.
झोपण्याआधी फोन वापरल्याने डोळ्यांत खुपणे, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो.
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा आहे की, दीर्घकाळ फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मेंदूच्या कॅन्सरचा धोका संभवतो.
झोपताना आपल्या उशापासून किमान 3 फूट अंतरावर फोन ठेवा. हे रेडिएशनपासून सुरक्षित अंतर मानले जाते.
फोनऐवजी पारंपरिक अलार्म घड्याळ वापरा. त्यामुळे रात्री फोनकडे हात जाण्याची सवय कमी होते.
रात्री फोन सायलेंटवर ठेवा, सोशल मीडिया स्क्रोलिंग थांबवा, यामुळे तुमची झोप सुधारेल आणि कुठलाच त्रासही होणार नाही.