जाणून तुम्ही थक्क व्हाल...!
गाढव, हा एक अत्यंत समजदार आणि मेहनती प्राणी आहे. होय, हे खरे आहे. आपण अनेकवेळा गाढवाला मूर्खपणाशी जोडतो, पण ते मुळीच मूर्ख नाही.
गाढव अत्यंत समजदार प्राणी असून, त्याला कोणतेही काम सहजपणे शिकवता येते.
खरेतर, गाढवासंदर्भात अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतील.
असाच एक प्रश्न म्हणजे, गाढवाचे आयुर्मान किती? अर्थात गाढव किती वर्षांपर्यंत जगतो.
तर गाढवाचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे एवढे असते.
कधीकधी गाढव ५० वर्षांपर्यंतही जिवंत राहू शकतो.
मात्र जंगली गाढवाच्या वयाचा विचार करता, त्याचे आयुर्मान पाळीव गाढवापेक्षा कमी असते.
जंगली गाढवाचे सरासरी आयुर्मान ३० वर्षे एवढे असते.