तुमच्या नावावर अनेक सिम कार्ड आहेत का? होईल नुकसान

जास्त सिम कार्ड तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला ५० हजारांचा दंड लागू शकतो.

भारतात आता एक व्यक्ती आपल्या नावावर जास्तीत जास्त ९ सिमकार्ड ठेवू शकते, तर जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ सिमकार्डपर्यंत आहे.

सरकारने तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व सिमकार्डची माहिती मिळविण्यासाठी संचार साथी पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे तुम्ही किती सिम नावावर आहे ते शोधता येते.

कोणीही तुमच्या आधारचा गैरवापर करू नये आणि बेकायदेशीर सिम मिळवू नये म्हणून हे पाऊल आवश्यक आहे. 

तुमच्या मोबाईल नंबरचे महत्त्व आणखी वाढते कारण हा नंबर बँकिंग सेवा, ओटीपी पडताळणी आणि आधारशी संबंधित अनेक सुविधांमध्ये वापरला जातो.

खात्री करा की तुमच्या नावावर फक्त वैध आणि आवश्यक सिम सक्रिय आहेत. जर एखाद्या व्यक्तीने निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड घेतले तर त्याला५०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

तुम्ही पुन्हा चूक केली तर ही रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नाही तर जर कोणी बनावट कागदपत्रे सादर करून सिमकार्ड मिळवले तर त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल होऊ शकतो .

सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या नावावर किती सिमकार्ड अॅक्टिव्ह आहेत ते नेहमी तपासा.

Click Here