तुम्हालाही सारखं तोंड येतं? जाणून घ्या कारणे

हे पाच पदार्थ ठरू शकतात अल्सरवर रामबाण उपाय.

तोंडातील अल्सर म्हणजेच जखमा केवळ वेदनादायक नसतात, तर खाणं-पिणंही कठीण करतात.

 तिखट पदार्थ खाताना त्रास वाढतो. हे अल्सर ताण, अयोग्य आहार, अन्नातील अॅलर्जी किंवा आतड्यांच्या संसर्गामुळे होऊ शकतात.

तोंडातील अल्सरवर बी-कॉम्प्लेक्स गोळ्या किंवा जेल वापरण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय करूनही आराम मिळू शकतो. 

तूप – अल्सरवर त्वरित शांती देणारा उपाय दररोज अल्सरच्या जागी थोडंसं तूप लावा, काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर थुंका. यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि हळूहळू अल्सर कमी होऊ लागतात. 

नैसर्गिक वेदनाशामक पेरूची कोवळी पानं किंवा कळ्या चघळल्याने अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते. तसेच हे उपाय अल्सर लवकर बरे होण्यासही मदत करतात.

शरीरातील उष्णता कमी करणारे एरंडेल तेल (कॅस्टर ऑईल) शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. वारंवार अल्सर होत असतील तर अल्सरच्या ठिकाणी हे तेल हलकेच लावा.

गुलकंद – गोड उपाय, पण प्रभावी दररोज जेवणाच्या आधी १ ते २ चमचे गुलकंद घेतल्यास अल्सरमुळे होणारी जळजळ कमी होते आणि जखमा लवकर भरतात. 

आयुर्वेदातील हे साधे उपाय शरीरातील संतुलन राखतात, त्यामुळे औषधांपेक्षा नैसर्गिक उपचारांनी अल्सरवर नियंत्रण ठेवणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. 

Click Here