हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा मोठा सल्ला
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो आणि हेच नियम खाद्यतेलालाही लागू होतात असं तज्ज्ञ सांगतात.
आपल्या स्वयंपाकघरात तेलाशिवाय काहीच पूर्ण होत नाही. अनेक घरांमध्ये 'आरोग्यासाठी चांगले' असा समज करून वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे तेल वापरले जाते. मात्र, डॉक्टरांच्या मते रोज एकाच तेलात स्वयंपाक करण्याची ही सवय पुढे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते."
डॉक्टरांच्या मते, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो आणि हेच नियम खाद्यतेलालाही लागू होतात.
दीर्घकाळ एकाच प्रकारचं तेल वापरण्याऐवजी वेळोवेळी तेल बदलणं किंवा मिश्र पद्धतीने वेगवेगळी तेलं वापरणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. कारण प्रत्येक तेलात वेगवेगळ्या प्रकारचे Fatty Acids आणि पोषक घटक असतात. शरीराला त्यांचा संतुलित फायदा मिळणं गरजेचं असतं.
मोहरीच्या तेलात Monounsaturated Fat आणि Omega-3 तुलनेने जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं. तर सूर्यमुखी तेलामध्ये Polyunsaturated Fat अधिक असतं, जे शरीरासाठी वेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरतं.
शेंगदाणा तेलाबद्दल बोलायचं झालं तर ते High-Heat Cooking साठी चांगलं मानलं जातं. म्हणजेच जास्त तापमानावर स्वयंपाक करताना त्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. दुसरीकडे Olive Oil हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं समजलं जातं आणि फिटनेसकडे लक्ष देणारे अनेक लोक त्याचा वापर करतात.
मात्र डॉक्टर स्पष्ट सांगतात की, “सर्वोत्तम तेल” असं एकच उत्तर नसतं. शरीराच्या गरजा, स्वयंपाकाची पद्धत आणि प्रमाण यानुसार तेलाची निवड बदलू शकते.
आजच्या काळात हृदयविकार, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशावेळी फक्त तेलाचं नाव पाहून नाही, तर त्याचा वापर कसा आणि किती केला जातो याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.