प्राण्यांना भूकंप अन् त्सुनामी येणार हे आधीच कळतं?
नैसर्गिक संकट येण्याआधीच प्राण्यांना ते समजत असते.
भूकंप आणि त्सुनामीसह अनेक नैसर्गिक आपत्ती अचानक येतात आणि त्यांचा अंदाज लावता येत नाही.
नैसर्गिक आपत्तींबद्दल आधीच आपल्याला माहिती असेल तर त्या टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करता येतील.
मानवांना सर्व संशोधन करूनही नैसर्गिक आपत्तीचा अंदाज लावता येत नाही, पण अनेक प्राण्यांना त्याबद्दल खूप आधीच माहिती मिळते.
कुत्रे, मांजरी, साप, बेडूक आणि मासे या प्राण्यांना आधीच नैसर्गिक आपत्तींची जाणीव होऊ शकते, असं अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे.
जीवशास्त्रज्ञ म्हणतात की कुत्रे आणि मांजरींसह अनेक प्राणी भूकंप किंवा त्सुनामी यायच्या काही सेकंद आधीच जाणवू शकतात. या काळात त्यांच्या हालचाली देखील बदलतात.
सामान्य लोकांना जमिनीच्या आत होणाऱ्या हालचाली ऐकू येत नाहीत. पण प्राण्यांमध्ये ऐकण्याची आणि अनुभवण्याची क्षमता खूप जास्त असते.
अहवालांनुसार, कुत्रे, मांजरी, साप आणि बेडूक यांसारखे प्राणी जमिनीतील हालचाली आणि कंपन आधीच जाणवू शकतात.
जमिनीतील हालचाल आणि कंपन जाणवल्यानंतर, हे प्राणी त्यांचा संदेश कोणालाही समजावून सांगू शकत नाहीत, यावेळी त्यांच्यात बदल झालेल्या दिसतो.
संशोधनानुसार, भूकंप जाणवल्यानंतर काही प्राणी अस्वस्थ होतात आणि इकडे तिकडे धावू लागतात किंवा इतर काही असामान्य वर्तन दाखवतात.