आपल्या राज्यात एक खास पुस्तकांचं गाव आहे, हे तुम्हाला माहितेय का?
२०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने भिलारला "पुस्तकांचं गाव" (Village of Books) म्हणून घोषित केलं
१५,०००+ पुस्तके: मराठी भाषेतली आणि काही इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तके या ठिकाणी ठेवलेली आहेत.
कोणीही पर्यटक या घरांमध्ये जाऊन पुस्तकं वाचू शकतो. ही पुस्तकं विक्रीसाठी नाहीत – फक्त वाचनासाठी.
हा उपक्रम ४ मे २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
गावातील १३ घरं वेगवेगळ्या विषयांसाठी अर्थात साहित्य, कविता, विज्ञान, जीवनचरित्र, बालवाङ्मय, इतिहास इत्यादींसाठी समर्पित आहेत.
भिलार हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ वसलेलं एक छोटंसं पण वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे.
अगदी कुणीही सामान्य व्यक्ती या गावात जाऊन, आपल्याला आवडेल ते पुस्तक घेऊन तिथेच वाचत बसू शकते.