युपीएससीच्या रॅकमध्ये झळकला तेव्हा बिरू मेंढरं चारत होता
आई-वडील दोघेही मेंढपाळ...कुटुंबाचे अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वणवण भटकत होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला अन् या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली.
येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवने गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
बिरूने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रैंक पटकावत यशाचा झेंडा फडकवला
परीक्षेच्या दिवशी बापाची तब्येत बिघडली, छोटी शस्त्रक्रिया झाली, त्यातही बिरूने परीक्षा देत घवघवीत यश मिळवलं
वडील सिदाप्पा व आई-बाळाबाई यांच्या कष्टामुळेच मला हे यश मिळाले. त्यांच्या कष्टाशी आयुष्यभर प्रामाणिक राहूनच सेवा करीन असं तो म्हणाला.