हळदीच्या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
हळदीच्या चहामध्ये अॅन्टीऑक्सिडन्टस् आणि दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हळदीचा चहा घरी बनवता येतो. त्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
डिटॉक्स हळदीचा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून आले, १/४ टीस्पून काळी मिरी, १ टीस्पून मध, २ कप पाणी
एका भांड्यात पाणी घ्या आणि ते गरम करा. ते मंद आचेवर उकळवा आणि त्यात उर्वरित साहित्य घाला.
पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या. डिटॉक्स हळदीचा चहा तयार आहे.
ही माहिती सामान्य आहे, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.