मानवाच्या पचनव्यवस्थेत सुधारणा आणि शरीराला मिळतो ताजेतवाणेपणा
धकाधकीच्या जीवनशैलीत रासायनिक पेयांपेक्षा सुरक्षित नैसर्गिक पर्याय म्हणून नारळ पाणी अधिक उपयोगी ठरते
इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्रोत असल्याने ते शरीराला त्वरित ऊर्जा देते, पचनसंस्थेला आराम देते आणि नैसर्गिक विषहरण प्रक्रियेस मदत करते
नारळ पाणी हे फक्त तहान भागवणारे पेय नसून आधुनिक जीवनशैलीत 'डेली हेल्थ स्ट्रॅटेजी' ठरते असं आहारतज्ज्ञांनी सांगितले
नारळ पाणी व गरामध्ये मॅग्नेशियम, मॅगनीज, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, झिंक व सेलेनियम यांसारखी उपयुक्त खनिजे असतात
ही खनिजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती, हाडांचे आरोग्य, शरीरातील चयापचय क्रिया व रक्ताभिसरणासाठी महत्त्वाची ठरतात
नारळ पाणी ताजे असणे महत्त्वाचे, औषधांवरील अवलंबित्व कमी होते, प्रक्रिया केलेले किंवा बाटलीबंद नारळ पाणी नैसर्गिक पाण्याइतके उपयुक्त नसते.
नारळ पाणी हे नारळातून बाहेर काढल्यानंतर लगेच प्यावे तरच ते फायदेशीर ठरते असं आहारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र मुर्हे यांनी सांगितले