स्थापत्यशैलीने 'ताजमहाल'ची आठवण करून देणारा बिबी का मकबरा हा मोहम्मद औरंगजेब याच्या पत्नी रबिया-उल-दौरानच्या स्मरणार्थ मुलगा आजम शाहने बांधलेलं भव्य स्मारक आहे.
बिबी का मकबरा ही शुद्ध मुघल शैलीतील वास्तू आहे. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे संगमरवराचा उपयोग, कमानी, गडद नक्षीकाम आणि सुंदर बागांचा समावेश.
छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे, बसस्थानक आणि विमानतळावरुन पर्यटक खाजगी किंवा सिटी बसने थेट बिबी का मकबऱ्यास पोहचू शकतात.
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मकबऱ्याची आकर्षक छायाचित्रे घेण्यासाठी फोटोग्राफर्स येथे गर्दी करतात. स्थापत्यशैली आणि प्रकाश यांचा मिलाफ सुरेख भासतो.
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये बिबी का मकबरा हे लोकेशन म्हणून वापरले गेले आहे.
देशी आणि विदेशी पर्यटकांची येथे वर्षभर वर्दळ असते. सायंकाळी लाईट शोमुळे मकबरा अधिक खुलून दिसत असून पर्यटकांची संख्या दिसवसेंदिवव वाढती आहे.