नात्यात वाद नेहमी होतच असतात.
बायको का रुसली आहे हे समजून घ्या. शांतपणे ऐका,बोलण्याआधी तिचं मन मोकळं होऊ द्या.
"तुझं मत आणि तू माझ्यासाठी महत्त्वाचं आहे" असं तिला वागण्यातून जाणवू द्या. तिला महत्व द्या.
कोणतंही कारण सांगताना प्रामाणिक रहा. खोटं बोलल्यास ती अजूनच दुखावू शकते. ते बायकोला समजावून सांगा.
बायकोच्या आवडीचं एखादा छोटासं गिफ्ट, फुलं किंवा आवडता पदार्थ देऊन तिचं मन जिंकू शकता. तिला सरप्राईज द्या.
तिच्याशी बोलताना पूर्ण लक्ष तिच्याकडे असू द्या. मोबाईल बाजूला ठेवा. याने ती खास असल्याचे जाणवेल.
तिची मनापासून स्तुती करा. तिच्या मेहनतीचं, दिसण्याचं किंवा स्वभावाचं कौतुक करा. पण ते खोटं नको.
तुमच्या दोघांची एखादी गोड आठवण सांगून तिच्या चेहऱ्यावर हास्य आणा. ती जरा फ्री होईल.
खरंच चुकलं असेल तर "माफ कर" एवढं साधं वाक्य खूप काही सुधारू शकतं. अहंकार बाजूला ठेवा. आणि चुकीची माफी मागा.
एकत्र वेळ घालवा, एकत्र बाहेर जा, जेवायला घेऊन जा किंवा शांत गप्पा मारा.
तिला मिठी मारा किंवा हात धरून बसा.स्पर्शामधून प्रेम व्यक्त होऊ शकतं. परवानगीने केलेला प्रेमळ स्पर्श मन हलकं करतो.