पावसाळ्यात कान आणि घशातील संसर्ग वाढतात, कानात बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वातावरणात बऱ्याच प्रमाणात बुरशीचे कण असतात, ते हवेतून सर्वत्र पसरतात.
इअरफोन, ब्ल्यूटुथ, इयरबड्स वापरल्याने कानात ओलसरपणा राहून 'ओटायटिस एक्सटर्ना' किंवा 'ओटोमायकोसिस' हा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
वातावरणात बऱ्याच प्रमाणात असलेले बुरशीचे कण हे जिथे ओलसरपणा आहे, त्याठिकाणी रुजतात. कोरड्या ठिकाणी हे कण रुजत नाहीत आणि त्या ठिकाणी बुरशी होऊ शकत नाही.
कानातील अस्वच्छता ही बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. खाज येणे, जळजळ होणे, हात लावल्यास कान दुखणे, खाताना कान दुखणे, कान बंद वाटणे लक्षणे जाणवताच डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.
पोहताना कानात मळ नसावा, पोहताना इअरप्लग वापरा, इअरफोन स्वच्छ करून वापरा. एकमेकांचे इअरफोन वापरू नका. कान कोरडे ठेवा. अंघोळ करताना कानात कापूस ठेवावा, नंतर तो काढून टाकावा.
कानात अनेकदा ओलावा राहणे, कानात सतत ड्रॉप्स घालणे, कानात तेल घालणे, अंघोळ करताना पाणी जाणे, अस्वच्छ इअरबड्स वापरल्यामुळे बुरशी होण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.