घरात सतत ढेकूण होतात? ढेकूण घालवण्याचे ५ सोपे उपाय
वातावरणातील मॉईश्चर आणि स्वच्छतेच्या अभावामुळे घरात ढेकूण तयार होता.
घरात पाली, मुंग्या किंवा झुरळं झाले तर त्यांना घालवणं सोपं असतं पण जर घरात ढेकूण झाले असतील तर त्यांना बाहेर काढणं कठीण होतं.
ढेकूण चावल्यामुळे अंगावर पुळ्यासुद्धा येतात. घरातील ढेकूण घालवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. अंथरूण किंवा घरातील असा सामान जिथे ढेकूण झाले असतील ते सामान काहीवेळ उन्हात ठेवा आणि त्या ठिकाणी व्हिनेगर घाला.
बेकींग सोडासुद्धा एक उत्तम पर्याय आहे. अंथरूण, लाकडाचे सामान यांवर बेकींग सोडा घातल्याने ढेकूण कमी होण्यास मदत होईल.
कडूलिंबाची पानं आणि कडुलिंबाचे तेल ढेकूण घालवण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
दालचिनीसुद्धा ढेकूणांना पळवण्यासाठी प्रभावी मानली जाते. दालचिनाचा उपयोग करून तुम्ही ढेकणांना कायमचं दूर ठेवू शकता.
घरात ढेकूण होऊ नयेत यासाठी जास्त दिवस कपडे न धुता ठेवू नका. बरेच महिने बेडशीट, उशांचे कव्हर न धुतल्यामुळे ढेकूण होतात.