आरोग्याचे ‘पांढरे शत्रू’, आजचं आहारातून करा आऊट!

आपण असे अनेक पदार्थ खात असतो ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. 

निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर आहारविहाराचे काही नियम पाळणं गरजेचं आहे.

आपण दैनंदिन जीवनात असे अनेक पदार्थ खात असतो ज्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच, असे पदार्थ आहारातून वजा करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणते ते पाहुयात.

साखर आपल्या आहारातून कमी केली पाहिजे. साखर तयार करतांना तिला अनेक रासायनिक प्रक्रियांमधून जावं लागतं. ज्यामुळे तिच्यातील पोषकतत्व नष्ट होतात. 

मैदा गव्हापासूनच तयार केला जातो. पण, त्यावर प्रक्रिया केली जाते त्यातच सर्व पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे शरीराचे नुकसान होते.

अनेकांना पदार्थात मीठ जास्त लागते. त्यांना खारट आणि मसालेदार पदार्थांची चव अधिक आवडते.पण, या गोष्टी आरोग्यासाठी  हानिकारक ठरतात. 

तांदूळ हादेखील रिफाईंड धान्य किंवा रिफाईंड कार्ब यामध्ये मोडतो. रिफायनिंग करताना त्यात भुसा आणि ब्रान काढून टाकले जाते, त्यामुळे नैसर्गिक बी कॉम्प्लेक्स, लोह आणि तंतुमय पदार्थ बाहेर टाकले जातात.

₹१० लाखांत मेसीसोबत काढा एक फोटो

Click Here