नारळाचं पाणी की उसाचा रस...? 

अधिक 'हेल्दी' काय...?

नारळाचे पाणी असो अथवा उसाचा रस, दोन्ही आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.

मात्र, या दोन्हीपैकी अधिक आरोग्यदायी अथवा हेल्दी काय? यासंदर्भात अनेकदा संभ्रम निर्माण होतो.

जर तुम्हाला शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी (Hydration) काही प्यायचे असेल, तर नारळाचे पाणी सर्वोत्तम.

मात्र, आपल्याला थकवा जाणवत असेल, तर ऊर्जेसाठी उसाचा रस प्यावा.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर उसाचा रस पिणे टाळा, तुमच्यासाठी नारळाचे पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.

नारळाचे पाणी पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करू शकते.

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, सोबतच यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम सारखे अनेक गुणधर्म आढळतात.

१ ग्लास डाळिंबाचं ज्यूस पिण्याचे फायदे...
जाणून थक्क व्हाल...

Click Here