ऑफिसमध्ये असताना अचानक माऊसचा सेल संपतो अन् मग...
आज प्रत्येकाचे आयुष्य वायरलेस होत चालले आहे. फॅन रिमोटवर, टीव्ही रिमोटवर, माऊस रिमोटवर...
या रिमोटला उर्जा देण्यासाठी सेल लागतो. हा सेल चांगल्या कंपनीचा घेतला तर बरेच महिने येतो.
तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि माऊसचा सेल अचानक संपला तर किती अडचण होते...
जेव्हा संपतो तेव्हा तो तुम्ही आणखी काही दिवस, महिने चालवू शकता. मग ते घड्याळ असेल की वजन करायचा काटा की आणखी काही...
हा संपलेला सेल लगेचच टाकून देऊ नका. आम्ही तुम्हाला वापरून पाहिलेली ट्रिक सांगणार आहोत.
सेल संपला की एक नायलॉनचा फडका घ्या. एखादी टेरिकॉटची पिशवी अगदी तुमची ऑफिस बॅग असली तरी चालेल...
या सेलचा पुढचा भाग म्हणजेच + साईन असलेला भाग तुम्हा १०-१५ वेळा त्या कापडावर घासा.
जरी तो सेल रिचार्जेबल नसला तरी त्यातील धनभार हा संपलेला नसतो. यामुळे तुम्ही तो सेल पुन्हा चार्ज करू शकता.
कोणतीही कंपनीचा सेल असुदे तुम्हाला माऊससाठी आरामात १५ दिवस जाणार. रिमोटसाठी महिनाभर, घडाळ्यासाठी देखील महिनाभर जाऊ शकतो. एकदा करून तर पहा...