पूर्वीच्या काळी पत्रांची विश्वासार्हता आणि राजमान्यता सिद्ध करण्यासाठी वापरलेला अधिकृत शिक्का म्हणजे मुद्रा.
मुद्रा म्हणजे काय? पूर्वीच्या काळी पत्रांची विश्वासार्हता आणि राजमान्यता सिद्ध करण्यासाठी वापरलेला अधिकृत शिक्का म्हणजे मुद्रा.
शिवमुद्रेची निर्मिती शिवभारत ग्रंथानुसार, वयाच्या १२ व्या वर्षी (१६४२ मध्ये) शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना पुणे जहागिरीसाठी पाठवताना ही मुद्रा प्रदान केली.
पहिले अधिकृत पत्र इतिहास संशोधकांच्या मते, शिवमुद्रा उमटवलेले पहिले अधिकृत पत्र १६४६ मधील उपलब्ध आहे.
दोन प्रकारच्या मुद्रा शिवकाळात पत्राच्या सुरुवातीला मुख्य 'शिवमुद्रा' आणि मजकूर संपल्याची खूण म्हणून शेवटी 'मर्यादा मुद्रा' वापरली जाई.
अष्टकोनी रचना शिवमुद्रा ही अष्टकोनी असून त्यावर संस्कृत भाषेतील श्लोक कोरलेला आहे, जे शिवरायांचे भाषेप्रती असलेले प्रेम दर्शवते.
शिवमुद्रेचा अर्थ "प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते."
मर्यादा मुद्रेचा मजकूर मर्यादा मुद्रेवर 'मर्यादेय विराजते' असा मजकूर असे, ज्याचा अर्थ 'येथे लेखनाची मर्यादा (शेवट) झाला' असा होतो.
मुद्रा उमटवण्याचे नियम कार्यालयीन पत्रात मुद्रा माथ्यावर, तर ज्येष्ठ व्यक्तींना किंवा संतांना पाठवलेल्या पत्रात आदरापोटी ती पत्राच्या मागे उमटवली जाई.
नौदलाचा नवीन लोगो भारतीय नौदलाचा नवीन लोगो छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच अष्टकोनी राजमुद्रेपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आला आहे.