तुमच्या फोनवर इंस्टॉल केलेले अ‍ॅप्स सुरक्षित आहेत का? असे तपासा

अॅप्सच्या माध्यमांतून अनेकांची फसवणूक होत असते.

आता फोनचा वापर फक्त फोनवर बोलण्यासाठीच नाही तर इतर अनेक कारणांसाठी केला जातो. फोनवर इन्स्टॉल केलेले अॅप सुरक्षित आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे तपासू शकता.

बँकिंग सेवांपासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंत, आज आपल्या फोनवर भरपूर अॅप्स आहेत.

कोणताही अॅप तुमच्या फोनमध्ये व्हायरस आणि मालवेअर आणू शकतो, जो तुमच्या मोबाईलचे नुकसान करु शकतो.

मालवेअर वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि ती हॅकर्सना देऊ शकते, जे नंतर या तपशीलांचा वापर करून तुमची फसवणूक करू शकतात.

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर गुगल प्ले स्टोअरमध्ये गुगल प्ले प्रोटेक्ट फीचर उपलब्ध आहे, जे तुम्हाला मदत करू शकते.

जर तुम्हाला तुमच्या फोनवरील अ‍ॅप्स स्कॅन करायचे असतील तर गुगल प्ले स्टोअर उघडा आणि तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा, तुम्हाला पर्याय दिसेल.

हे फीचर गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेल्या अॅप्सचे पूर्णपणे स्कॅन करेल आणि फोनमध्ये असे कोणतेही अॅप आहे का जे डिव्हाइससाठी आणि तुमच्यासाठी असुरक्षित आहे हे सांगेल.

जर तुम्हाला तुमच्या फोनवरील अ‍ॅप्स स्कॅन करायचे असतील तर गुगल प्ले स्टोअर उघडा आणि तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा, तुम्हाला पर्याय दिसेल.

Click Here