फक्त ६ सवयी बदला, व्हाल सुपरफिट, ठणठणीत तब्येतीसाठी सोपा फॉर्म्युला
निराेगी दिर्घायुष्य जगण्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात काही छोटे बदल केले तरी ते पुरेसे ठरतात.
दररोज किमान ६ हजार पावलं तरी चालायला हवं. यामुळे शरीर ॲक्टीव्ह राहण्यास मदत होते. पचन, मेटाबॉलिझम, पायांचे आरोग्य अशा अनेक गोष्टी चालण्याच्या व्यायामामुळे उत्तम राहतात.
त्यामुळे दररोज चालण्याचा व्यायाम कराच. १० हजार पावलं जर तुम्ही दर दिवशी चालू शकलात तर उत्तम...
आठवड्यातून ३ ते ४ दिवस तरी नियमितपणे व्यायाम करा. तुम्ही करता तो व्यायाम दररोज वेगवेगळा असायला हवा, जेणेकरून संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल.
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.. बऱ्याच लोकांना सतत काही ना काही तोंडात टाकण्याची सवय असते. ती सवय सोडा.
नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या जेवणाच्या वेळा ठराविक असाव्या. त्याच वेळेला पोटभर जेवा. जर २ जेवणांच्यामध्ये भूक लागलीच तर फळं, लाह्या, ताक असे पदार्थ घेऊ शकता.
तुम्ही जेवणात काय खात आहात हे देखील खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ, फळं, भाज्या आहारात जास्तीतजास्त असायला हव्या. त्याचबरोबर कार्ब्स, गोड पदार्थ आणि फॅटी पदार्थांचा अतिरेक टाळा.
नेहमीच खूप भरपेट जेवू नका. जेव्हा तुमचं जेवण होईल तेव्हा पोटात थोडी जागा निश्चितच असायला हवी. ओव्हरइटिंगमुळे पचन, मेटाबाॅलिझम या सगळ्याच गोष्टीत अडथळा येतो आणि वजन वाढतं.
७ तासांची रात्रीची शांत झोप खूप गरजेची आहे. तिच्यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. जेवढी शांत आणि पूर्ण झोप घ्याल तेवढे तुमचे आरोग्य उत्तम राहील.