चांदोली धरण हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आहे.
हे धरण वारणा नदीवर बांधले आहे आणि ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मातीचे धरण आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात हे धरण आहे, त्यामुळे ते पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
चांदोली अभयरण्यात भैरवगड, प्रचितिगड या 17व्या शतकातील किल्ल्यांपर्यंत पुढे ट्रेक करता येतो.
छोट्या ट्रेक मार्गांमध्ये समृद्ध जंगलांना भेट, नदीचे काठ, थंडदायक धबधबे यांचा अनुभव घेता येतो .
चांदोली अभयारण्य ऐतिहासिक ठिकाणे, वन्यजीव निरीक्षण, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, डॅम परिसर, कॅम्पिंग अशा विविध अनुभवांनी परिपूर्ण आहे.
सांगलीपासून ८० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विस्तारलेले हे जंगल आहे.