नेमकं काय सांगतात चाणक्य...?
आचार्य चानक्य यांच्याकडे एक कुशल राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि महान विद्वान म्हणून बघितले जाते. त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.
आचार्य चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास केला आणि मार्गदर्शन केले आहे.
चाणक्य नीती सांगते, कधीकधी मूर्ख असल्याचे नाटक करणे आवश्यक असते.
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येकावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.
चाणक्य म्हणतात, जी व्यक्ती आपल्या खऱ्या क्षमता लपवून ठेवते, तिच खरी ज्ञानी व्यक्ती.
अनेकवेळा, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेण्यासाठी, स्वतः मूर्ख असल्याचे नाटक करावे लागले.
इतरांचे खरे हेतू जाणून घेण्यासाठी, कधीकधी मूर्ख असल्याचे भासवावे लागते.
जेव्हा लोक तुम्हाला त्यांच्य पेक्षा कमी ज्ञानी समजतात, तेव्हा ते त्यांच्या खऱ्या रंगात समोर येतात.
महत्वाचे म्हणजे, सर्वात विश्वासू व्यक्तीसोबतही आपली सर्व रहस्ये शेअर करू नयेत, असा सल्लाही चाणक्य देतात.