भारतात नद्यांना मोठे धार्मिक महत्व आहे. पण, अशी एक नदी आहे, जी शापित मानली जाते.
भारतात अनेक नद्या आहेत. यातील बहुतांश नद्यांना मोठे धार्मिक महत्व लाभले आहे. पण आम्ही तुम्हाला अशा नदीबद्दल सांगणार आहोत, जी शापित मानली जाते.
गंगा, नर्मदा आणि गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याला पुण्य मिळते, परंतु या शापित नदीची पूजा केली जात नाही किंवा त्यात स्नानही केले जात नाही.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वाहणाऱ्या चंबळ नदीबद्दल लोकांमध्ये विविध धारणा आहेत. असे म्हटले जाते की, या नदीत स्नान केल्याने पुण्यऐवजी पाप मिळते.
चंबळ नदीच्या शापामागे महाभारत काळाची एक कथा आहे. असे मानले जाते की एकदा येथील राजा रती देवाने चंबळ नदीच्या काठावर शेकडो प्राण्यांचा बळी दिला होता.
या प्राण्यांचे रक्त नदीत मिसळले आणि संपूर्ण नदी रक्ताने लाल झाली. तेव्हापासून नदीला शापित नदी मानले जाऊ लागले. असे म्हणतात की, यात स्नान केल्याने जीवनात समस्या येतात.
आणखी एक कथा अशी आहे की, महाभारत काळात पांडव सारीपाट खेळात द्रौपदीला हरले आणि कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला, ती घटना याच चंबळ नदीच्या काठावर घडली होती.
त्यानंतर संतप्त झालेल्या द्रौपदीने नदीला शाप दिला. त्यामुळेच आजही लोक चंबळचे पाणी पिणे आणि त्यात स्नान करणे टाळतात. शापित झाल्यामुळे नदीची पूजाही केली जात नाही.