काजू-बदाम-अक्रोड प्रत्येकाचे आहेत वेगवेगळे फायदे

पाहा कोणता सुका मेवा जास्त पॉवरफुल

सुका मेवा आपल्या रोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यांना सुपरफूड म्हटले जाते. कारण त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

भिजवल्याने सुक्या मेव्यांमध्ये असलेले एंजाइम सक्रिय होतात आणि फायटिक अॅसिड कमी होते, ज्यामुळे ते पचण्यास आणि शोषण्यास सोपे होते. 

भिजवलेले सुके मेवे शरीराला अधिक जीवनसत्त्वे बी आणि ई प्रदान करतात. जे त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, फायबर आणि निरोगी चरबी मेंदूचे कार्य वाढवतात आणि त्वचा सुधारतात.

भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते, कोलेस्टेरॉल नियंत्रित होते आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखले जाते. सालीशिवाय ते खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण चांगले होते.

अक्रोड खाण्यापूर्वी किमान 8 ते 10 तास पाण्यात भिजवावे. त्यात फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि प्रथिने भरपूर असतात. भिजवल्याने त्यात असलेले फायटिक अॅसिड कमी होते.

अंजीर हा एक सुकामेवा आहे, जो शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत.

Click Here