आता कार किंवा दुचाकी घेताना ती ०-१०० किमी प्रति तास एवढा वेग किती वेळात गाठू शकते याची माहिती घेतली जाते.
त्यावरच तुम्ही घेत असलेली गाडी पिकअप घेणारी आहे, किती शक्तीशाली आले याचा अंदाज घेता.
तुम्ही अनेकदा रिक्षा रिव्हर्समध्ये पळविल्याच्या स्पर्धांचे व्हिडीओ पाहता.
पण कधी कार किती वेगात रिव्हर्समध्ये पळू शकते याचा विचार केलाय का...
जगात अशी एक कार आहे जी रिव्हर्स गियरमध्ये सर्वात वेगाने धावू शकते. ती म्हणजे रिमॅक नेव्हेरा.
या कारने रिव्हर्स गियरमध्ये ताशी २७५.७४ किलोमीटर वेगाने धावण्याचा विक्रम केला आहे.
परंतू, प्रत्येक कार अशी पळू शकत नाही, कारण तिचे इंजिन.
तुमच्याकडील कार तुमच्या कारच्या इंजिनाच्या ताकदीनुसार रिव्हर्समध्ये वेगाने पळू शकते.
म्हणजेच प्रत्येक कारचा रिव्हर्स गिअरमध्ये पळण्याचा वेग हा कमी जास्त असू शकतो.
बहुतेक वेळा आपण रिव्हर्स गिअरचा वापर कार पळविण्यासाठी नाही तर कार मागे-पुढे करण्यासाठीच करतो.