Android फोनवर कॉल रेकॉर्ड करता येणार; समोरच्याला कळणारही नाही

सध्या कॉल रेकॉर्ड करण्याआधीच समोरच्याला अलर्ट जातो.

आपण ज्यावेळी कॉल रेकॉर्डिंग सुरू करतो तेव्हा आधीच समोरच्या त्याचा अलर्ट देतो. यामुळे समोरचा व्यक्ती सावध होतो. 

कधी कधी काही कॉल आपल्याला रेकॉर्ड करायचे असतात पण या अलर्टमुळे कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. 

फोनवर गुप्त फिचर असतात यामध्ये कोणताही अलर्ट न पाठवता कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. त्याऐवजी, लहान बीपिंग आवाज ऐकू येईल, यामुळे समोरच्या व्यक्तीला रेकॉर्डिंगबद्दल सतर्क करणार नाही.

काळजी करू नका, तुम्हाला तुमचा फोन रूट करण्याची किंवा कोणतेही संशयास्पद अॅप्स इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही.

कॉन्टॅक्ट्स अ‍ॅप उघडा.वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉटवर क्लिक करा. "सेटिंग्ज" उघडा. "कॉल रेकॉर्डिंग" किंवा "कॉल सेटिंग्ज" शोधा.

तुमच्या फोनच्या प्रकारानुसार नाव बदलू शकते. कॉल रेकॉर्डिंगमध्ये, "डिस्क्लेमरऐवजी प्ले ऑडिओ टोन" किंवा काहीतरी पर्याय शोधा.

तो स्विच चालू करा. आता तुमचा फोन मोठा अलर्ट देण्याऐवजी एक लहान बीप करेल. 

हे सेटिंग तंत्रज्ञान कंपन्या पाच मेनू टॅप्सच्या मागे उपयुक्त फिचर कशी लपवतात याचे एक चांगले उदाहरण आहे. परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे कायद्याच्या विरुद्ध आहे. 

Click Here