मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की राज्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
तसेच सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून फसवणूक झालेल्यांपैकी अधिक रक्कम परत मिळवण्यात येत आहे.
यासोबत कुठल्याही सायबर गुन्ह्यात पैसे गेले असतील तर संबधित नंबरवर फोन केल्यास पैसे परत मिळवता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण २०२२ मध्ये १६.४५ टक्के होतं ते आता १९ टक्क्यावर गेलं आहे.
२०२१ सालापर्यंत फसवणूक झालेल्यांपैकी २.७५ टक्केच रक्कम ताब्यात येत होती. आता हे प्रमाण १६ टक्के आहे.
गोल्डल हवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण ९० टक्के प्रकरणांमध्ये पैसे वाचवू शकतो
आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यात १९३० किंवा १९४५ हा नंबर डायल करुन पैसे वाचवता येऊ शकणार आहेत.
या क्रमाकांचा वापर केला तर तात्काळ कमीत कमी वेळात ते पैसे कुठेही गेले असतील तर थांबवू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.