ब्राउन राइस vs व्हाइट राइस; आरोग्यासाठी कोणता चांगला?
भारतीयांच्या दैनंदिन आहारात भाताला खूप महत्व आहे.
भात भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. हा आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा अन्न आहे. भाताचे ब्राउन राईस आणि व्हाइट राइस, असे दोन प्रकार पडतात.
या दोन्हींची प्रक्रिया वेगळी आहे, चव वेगळी आहे आणि आरोग्यावर होणारा परिणामही वेगळा आहे. या दोन्हीतील फरक काय आहे आणि कोणता अधिक आरोग्यदायी आहे?
ब्राइन राइसमध्ये जास्त फायबर, जीवनसत्त्वे (बी१ आणि बी३) आणि खनिजे (मॅग्नेशियम आणि लोह) असतात. एक कप शिजवलेल्या ब्राउन राइसमध्ये सुमारे ३.५ ग्रॅम फायबर असते.
तर व्हाइट राइसमध्ये फक्त ०.६ ग्रॅम फायबर असते. व्हाइट राइसच्या दळण आणि पॉलिशिंग दरम्यान आवश्यक पोषक घटक कमी होतात.
ब्राउन राइसमुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास अधिक मदत होते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) कमी असतो, म्हणजेच तो हळूहळू साखर वाढवतो.
व्हाइट राइसमध्ये जास्त जीआय असते, ज्यामुळे साखर लवकर वाढते. हा वारंवार आणि जास्त प्रमाणात खाल्ला तर टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
व्हाइट राइस मऊ असतो, लवकर शिजतो आणि सहज पचतो. म्हणूनच, अनेकदा लहान मुलांना, वृद्धांना किंवा पोटाच्या समस्या असलेल्या लोकांना दिला जातो.
तर, ब्राउन राइस शिजण्यास जास्त वेळ लागतो आणि जास्त चावण्याची आवश्यकता असते. तसेच, प्रत्येकाला त्याची चव आवडत नाही.
दोन्ही तांदूळ निरोगी आहाराचा भाग असू शकतात, परंतु ब्राउन राइस त्याच्या हाय फायबर आणि कमी जीआयमुळे चांगला मानला जातो.