पचनशक्ती स्ट्राँग करण्यासाठी ट्राय करा या टिप्स
बदलत्या ऋतुचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यात हिवाळ्यात अनेकांना पचनक्रियेच्या तक्रारी जाणवतात.
वाढत्या थंडीमुळे अनेकांना बद्धकोष्ठता, पोटदुखी, अन्नपचन नीट न होणे यांसारख्या तक्रारी जाणवतात. म्हणूनच, थंडीच्या दिवसात पचनशक्ती मजबूत करण्यासाठीच्या टिप्स पाहुयात.
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर रोज न चुकता कोमट पाणी प्या. यामुळे मलत्याग होण्यास मदत मिळते. तसंच चयापचया क्रियेचा वेगही वाढतो.
हिवाळ्यामध्ये घरी तयार केलेला हर्बल टी प्यावा. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
आहारात प्रोटीन, फायबर यांसारख्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा.
शक्यतो हलका आहार घ्या. जास्त तेलकट, पचायला जड पदार्थांचं सेवन करु नका.
वर्कआऊट, वॉकिंग करा. दिवसातून किमान अर्धा तास तरी चाला. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर होतील.