नको बाई लग्न! घटस्फोटानंतर कायम सिंगल राहिलेल्या अभिनेत्री...

डिव्होर्स झाला पण पुन्हा लग्न नाही; 'या' अभिनेत्री अजूनही सिंगल... 

बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री ज्यांनी घटस्फोटाचा कडू अनुभव घेतला, पण त्यानंतर पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेत स्वतःचे आयुष्य जगणे पसंत केले.

करिश्मा कपूरने २००३ मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले होते. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करिश्माने पुन्हा लग्न केलेले नाही.

अमृता सिंगने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले होते. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर तिने पुन्हा लग्न केले नाही.

कल्की कोचलिनने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा लग्न केले नाही.

अरबाज  आणि मलायका अरोरा यांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायकाने दुसरे लग्न केलेले नाही.

अभिनेता रणवीर शौरीसोबतच्या घटस्फोटानंतर कोंकणा सेन शर्मा आपल्या मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

पूजा भट्टने २००३ मध्ये मनीष मखीजासोबत लग्न केले होते. २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ती सध्या सिंगल आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी लग्नाच्या ११ वर्षांनंतर २०२४ मध्ये वेगळ होण्याचा निर्णय घेतला. 

अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने २०१४ मध्ये गोल्फर ज्योती रंधावाशी घटस्फोट घेतला.

Click Here