चमत्कारिकच! पाहा हुबेहुब एकमेकींसारख्या दिसणाऱ्या बाॅलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड मधील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या दिसायला थोड्याफार प्रमाणात एकमेकींसारख्याच दिसतात.

बॉलिवूड मधील अभिनेत्रींच्या  चेहऱ्यावरील वैशिष्ट्य, हावभाव, स्टाईल आणि रूप पाहून अनेकदा चाहत्यांचा देखील गोंधळ होतो. 

 अशा काही बॉलिवूड अभिनेत्री ज्या एकमेकींच्या हुबेहूब डुप्लिकेट दिसतात. 

सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांनी कियाराला "यंग हेमा मालिनी" म्हणत तिची तुलना हेमा मालिनीशी केली आहे. काही फोटोजमध्ये तर त्या अगदी हुबेहूब दिसतात.

परवीन बाबी आणि दीपशिखा दोघींच्या चेहऱ्याचे स्ट्रक्चर, मोठे डोळे, ग्लॉसी स्किन आणि मेकअप स्टाईल खूपच एकसारखे असल्याने त्या दोघी सारख्याच दिसतात. 

स्नेहा उलाल बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिची तुलना लगेच ऐश्वर्या रायसोबत केली गेली. दोघींचा चेहरा, डोळे आणि स्माइल खूपच सारखी दिसते.

दिव्या भारती व श्रीदेवी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि चेहऱ्यात इतके साम्य होते की अनेकदा दिव्याला 'दूसरी श्रीदेवी' असं म्हटलं जायचं.

झरीन खानला चाहत्यांनी तिला ‘कतरीना की हमशकल’ म्हटले. तिचा लूक आणि हसरा चेहरा कतरीनाशी खूप मिळताजुळता आहे.

माधुरी दीक्षित बॉलिवूडची क्वीन तर निकी वालिया टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आयकॉनिक चेहरा मानली जाते, या दोघींच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे. 

सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांच्यात जबरदस्त साम्य आहे. विशेषतः चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळे दोघी खूपच एकसारख्या दिसतात.

Click Here