जाणून घ्या तिच्या कुटुंबाबद्दल...
भूमी पेडणेकरने आज बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूडमध्ये तिनं 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
भूमी पेडणेकरचे महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे.
ती मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली आहे. तिचं शिक्षणही मुंबईत झालं आहे.
भूमी पेडणेकरचे वडील सतीश मोतीराम पेडणेकर महाराष्ट्राचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते.
भूमी अवघ्या १८ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले.
तिची आई, सुमित्रा पेडणेकर, एक सामाजिक कार्यकर्त्या आहे.
भूमीला एक लहान बहीण आहे. तिचं नाव समीक्षा आहे, जी एक वकील आहे.