केसगळती थांबवण्यासाठी केसांना कोणता हेअर मास्क लावायला हवा पाहूया.
बदलेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसगळतीची समस्या वाढत आहे. यावर उपचार म्हणून आपण अनेक केमिकल्सचा वापर करतो.
पण केसांना योग्य हेअर मास्क लावल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.
केसांचा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला मेथीचे पाणी, त्रिफळा पावडर, आवळा पावडर आणि तुळशीच्या पानांची पेस्ट लागेल.
सगळ्यात आधी त्रिफळा आणि आवळा पावडर एकत्र करा, त्यात मेथीचे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.
हेअर मास्क लावण्यापूर्वी टाळूला थोडे तेल लावा. १० मिनिटे हळूहळू मसाज करा. नंतर टाळू घासा.
हा हेअर मास्क टाळूवर लावा. संपूर्ण टाळूला पसरेल याची खात्री करा.
हा मास्क १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या. पूर्ण सुकू देऊ नका. नंतर केस कोरडे होऊ शकतात.
नंतर केस कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.