आतड्यांचे आरोग्य सुधारणारे ५ हेल्दी ड्रिंक्स कोणते पाहूया.
चांगल्या आरोग्यासाठी पोट व्यवस्थित कार्यरत असणं आवश्यक आहे. काही आयुर्वेदिक पेय प्यायल्याने पचन सुधारण्यास मदत होते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळाचे पेय प्यायल्याने पोटाला फायदा होतो. यामुळे पचन सुधारते, चयापचय संतुलित होते.
सुकलेले आले पाण्यात उकळा. त्यात गूळ आणि काळी मिरी घालून गाळून प्या. यामुळे अपचन, पोट जड वाटणे किंवा मळमळ यापासून आराम मिळतो.
कोमट पाण्यात आवळ्याचा रस आणि मध घालून जेवणाच्या अर्धा तासाआधी प्या. ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि शरीरात ऊर्जा राहिल.
एक कप पाण्यात बडीशेप आणि हिंग मिसळून ड्रिंक तयार करा. रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते, ज्यामुळे पोटही हलके राहते.