५ बेस्ट बजेट बाइक्स, किंमत फक्त ६१ हजार...

जीएसटी कपातीमुळे २२ सप्टेंबरपासून या बाइक्स आणखी स्वस्त होणार आहेत.

भारत हा जगातील सर्वात मोठा टू-व्हीलर उत्पादक देश आहे. भारतात सर्वाधिक विक्री 100-110cc सेगमेंटच्या बाइक्सची होते. 

लो मेंटेनन्स, उत्तम मायलेज आणि कमी किमतीमुळे या बाइक्सना ग्राहकांची पहिली पसंती असते. अशाच काही लोकप्रिय बाइक्सबद्दल थोडक्यात माहिती.

Hero HF 100- याची सुरुवातीची किंमत ₹61,018 आहे. यात 97.2cc इंजिन असून ते 7.91 BHP पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. ही 70 KMPL पर्यंत मायलेज देते. 

TVS Sport- टीव्हीएस स्पोर्टची किंमत ₹63,358 पासून सुरू होते. यात 109.7cc इंजिन असून 8.08 BHP पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क निर्माण करते. ही 75 KMPL पर्यंत मायलेज देते. 

Bajaj Platina 100- बजाज प्लेटिना 100 ची किंमत ₹70,611 पासून सुरू होते. यात 102cc इंजिन असून 7.9 BHP पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क देते. ही 80 KMPL मायलेज देते. 

Honda Shine 100- होंडा शाइन 100 ची किंमत ₹66,862 आहे. यात 98.98cc इंजिन असून 7.38 BHP पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. ही 67.5 KMPL मायलेज देते. 

Hero Splendor Plus- हीरो स्प्लेंडर प्लसची किंमत ₹80,016 पासून सुरू होते. यात 97.2cc इंजिन असून 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. ही 83 KMPL पर्यंतचे मायलेज देते. 

सध्या या बाइक्सवर 28% जीएसटी आहे. मात्र 22 सप्टेंबरपासून जीएसटी 18% होणार आहे. त्यामुळे या बाइक्सची किंमत आणखी कमी होईल. 

Click Here